पंढरपूर प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या आशीर्वाद तसेच महाराष्ट्र अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या शुभहस्ते लोणावळा येथे कुमार भिवाजी भोसले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र नेते आप्पासाहेब जाधव पश्चिम महाराष्ट्र नेते बाळासाहेब कसबे अर्जुन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुमार भोसले म्हणाले की ,माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्या वर रिपाइंचे नेते रामदास आठवले व राजाभाऊ सरवदे यांनी जी जबाबदारी दिली आहे. ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करीन.शासनाच्या विविध प्रकारच्या योजना सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहचविणार आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्न करणार आहे.
या निवडी बद्दल भाळवणीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातुन भोसले यांचे जल्लोष करून अभिनंदन केले जात आहे.