सोलापूर प्रतिनिधी
प्रशालेचे नाव उज्वल करणारी बातमी म्हणजे प्रशालेचे पर्यवेक्षक बिराजदार एस ए आणि सहशिक्षिका वैशाली डांगे मॅडम यांना मिळालेला "जिल्हा स्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार".
पर्यवेक्षक बिराजदार सर आपल्या अध्यापनातून सातत्याने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, ज्ञान आणि शिस्त यांचे पाठ देण्याचे कार्य करत आहेत.आपल्या भारदस्त वाणीतून विद्यार्थ्यावर ठसा उमटवणारे असे पर्यवेक्षक सर यांना "जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार "प्राप्त झाला.
तसेच सहशिक्षिका वैशाली डांगे मॅडम यादेखील आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्याना घडवण्याचे कार्य उत्तमरीतीने करत आलेत.
प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर व शरणार्थी मॅडम यांच्या हस्ते बिराजदार सर आणि डांगे मॅडम या गुणवंत शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अतनुरे सर यांनी या सत्कारमूर्तीचे कौतुक करत त्यांच्या भावी शिक्षण कार्यास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख व्हनकडे यांनी केले

