लक्ष्मी दहिवडी प्रतिनिधी
मारापुर मंडल असल्याने आम्हा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित रहावे लागते. याशिवाय मारापुर हे नदी लगत गाव असुन लक्ष्मी दहिवडी हे गाव दुष्काळी भागात आहे याशिवाय या गावाला पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही परंतु मारापुर हे गाव नदी लगत असल्याने लक्ष्मी दहिवडीतील शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय होत आहे. यामुळे मारापुर मंडल मधुन लक्ष्मी दहिवडी गाव तात्काळ वगळण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली आहे.
आमदार आवताडे हे सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लक्ष्मी दहिवडी येथे आले होते. यादरम्यान गावातील नागरिकांनी रखडलेल्या रस्ते, गावाला पुर्ण वेळ ग्रामसेवक, दलित वस्ती अंगणवाडी, प्राथमिक शाळा नवीन इमारत निधी, जल जीवन कामे, क्राॅक्रिट रस्ते, वाडीवस्ती पाणी पुरवठा, चारा छावणी तसेच भविष्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले माञ अद्याप निधी मिळाला नाही, माळी स्मशानभूमीत निधी उपलब्ध करून देण्याबाबत, रेशन दुकानात धान्य भेटत नाही, पी किसान योजना, हातपंप दुरूस्त, वैयक्तिक विद्युत कनेक्शन अशा अनेक तक्रारीचा पाडा गावातील ग्रामस्थांनी आमदार आवताडे यांच्या समोर लेखी निवेदनाद्वारे दिला. यामधील ठराविक निवेदनाच्या तक्रारी ग्रामस्थांसमोर सबंधित अधिकार्यांना जाब विचारू तक्रारी सोडविण्याच्या सुचना दिल्या.
या बैठकीस तहसीलदार मदन जाधव, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, तलाठी गणेश पंडीत, ग्रामसेवक गोरे, मंडल अधिकारी, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नंदकुमार कोष्टी, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत साळे, आण्णा शेजाळ, मल्लीकार्जुन पाटील, राजकुमार मेटकुटे, नवनाथ बनसोडे, सिद्धेश्वर बनसोडे, धनंजय पाटील, माजी सरपंच विलास पाटील, दत्तात्रय नवञे आदीसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आवताडे यांच्या गावभेट दौऱ्यात सरपंच मनिषा जुंदळे, अनिता उपसरपंच पाटील यांची गैरहजेरी होती. १३ पैकी फक्त ३ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जुंदळे यांचीही गैरहजेरी दिसुन आल्याने येणार निवडणूक राजकीय समीकरण कशी असणार याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चा होत आहे.