पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे
मुंबई जोगेश्वरी पूर्व येथील तेज न्यूजचे प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार गणेश हिरवे यांना महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संथेच्या विशेष सहकार्याने आणि इनोव्हेटिव मानबिंदू प्रकाशन, अमरदिप बालविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्कार आयोजक एन डी खान यांनी जाहीर केला आहे.येत्या ८ ऑक्टोबर रोजी वाशी येथील कार्यक्रमात हिरवे यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.हिरवे यांचे काम जबरदस्त असून सामाजिक क्षेत्रा बरोबरच इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.
आमच्या निवड समितीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देत असल्याचे खान यांनी म्हटले आहे.करोना काळात देखील हिरवे यांनी अतुलनीय काम केलं होत.हिरवे यांना आतापर्यंत विविध राज्य व राष्ट्र स्तरीय असे १२४ पुरस्कार मिळाले असून त्यांच्या सारखे अग्रेसर राहून काम करणाऱ्या व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी असतील त्या संस्थेसाठी ते भूषणावह आहे.पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी हिरवे सरांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.