जिथे जिथे पेशंटचा विषय गंभीर तिथे तिथे बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची टीम खंबीर,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ,श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेशजी चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पेशंटचे नाव विजया जाधव कनेरी या बऱ्याच दिवसापासून आजारी असून त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी दाखवले असता त्यांना कुठल्याही दवाखान्याचा फरक पडला नसून त्यांचे दवाखान्यासाठी खूप पैसे गेले असल्याकारणाने त्यांना पुढील उपचार करणे शक्य नव्हते.
त्यामुळे त्यांनी श्री क्षेत्र कनेरी देवस्थानचे गुरुवर्य लक्ष्मण महाराज कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे यांच्याशी 98 500 202 74 या फोनवरती संपर्क साधला असता त्या पेशंट संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती दिली .
असता तात्काळ सतीश गावडे यांनी या पेशंटला मेडिकल कॉलेज येथे जाऊन तपासणी करण्यास सांगितले नंतर पेशंट मेडिकल कॉलेज येथे तेथील तज्ञ डॉक्टरांना त्या पेशंटला दाखवले असता त्यांना मेडिसिन देऊन घरी पाठवले त्यांना तसे ॲडमिट करण्याचीच गरज होती परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करण्यास नकार दिला लागलीच पेशंटच्या नातेवाईकांनी सतीश गावडे यांना फोन केला करून सतीश गावडे व शिवसेना वैद्यकीय टीम व महिला आघाडी यांनी तात्काळ व ताबडतोब मेडिकल कॉलेज येथे जाऊन तेथील डॉक्टरांना मान सन्मानाने विनंती करून वरील पेशंटला ऍडमिट करून सलाईन लावण्याची विनंती केली त्यामुळेच वरील डॉक्टरने लगेच महिला हॉस्पिटलमध्ये या पेशंट वरती सध्या चांगल्या प्रकारे उपचार चालू केले त्यामुळे पेशंटच्या चेहऱ्यावरती हसू फुलले व पेशंटच्या नातेवाईकांनी वरील मान्यवरांचे व तात्काळ व वेळ काढून वरील पेशंटला खूप मोलाचे सहकार्य केल्यामुळे सतीश गावडे यांचे व न्यू शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बारामती व महिला आघाडी वैद्यकीय टीम सर्व यांचे पेशंटच्या नातेवाईकांनी खूप खूप आभार व्यक्त केले.