सोलापूर प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलांचे संस्थापक व थोर समाजसेवक महान विभूती कै.आप्पासाहेब काडादी यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली समर्पित करण्यासाठी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री.दत्तात्रय थोरे (लोकमत संपादक) व श्री चन्नवीर भद्रेश्वर (लेखक) यांना आमंत्रित केले होते. कै. आप्पासाहेब काडादी यांच्या उदात्त कार्याचे स्मरण हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
आपल्या भाषणातून प्रमुख अतिथी श्री थोरे सरांनी शिक्षण क्षेत्रातील आप्पासाहेबांच्या असामान्य व उदात्त कार्याबद्दल उदाहरण देत अभ्यास ध्यास व सिद्धी ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांना दिली. श्री भद्रेश्वर सरांनी देखील सामान्यातून असामान्यतेचे उदाहरण दाखले विद्यार्थ्यांना दिले. कु. इशिता गुमडेल ह्या विद्यार्थिनीने मोगरा फुलला या गीतातून काव्यसुमनांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवीच्या विद्यार्थीनी कु. तनिष्का नागणे, मनस्वी पाटील यांनी केले. अमेय जवंजाळ या विद्यार्थ्याने आपल्या शब्दातून पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार होते. शिक्षक वृंद व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पृथ्वीराज लाड या विद्यार्थ्याने केले.