सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय ,क्रीडा परिषद व कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या शालेय शहरस्तर कॅरम स्पर्धेत नेताजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले.प्रशालेतील आठ खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अंतिम निकाल -१४ वर्षे मुले- समर्थ कोटलगी (प्रथम), १४ वर्षे मुली-वैष्णवी वन्नम- (द्वितीय),१७ वर्षे मुले-श्रीशैल जेऊरे (द्वितीय), इरणा मादगुंडी (तृतीय),१७ वर्षे मुली -राधिका चोळके (द्वितीय ), १९ वर्षे मुले-विनोद रायचूरकर (द्वितीय),साई अन्नम( तृतीय ), १९ वर्षे मुली - वैष्णवी कोंकत्ती (प्रथम) या सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल कुंभार ,सूर्यकांत बिराजदार , विश्वाराध्य मठपती , अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार ,प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.