भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख तथा श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या समर्थनार्थ भाळवणी येथील व्यापाऱ्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने पाळलेल्या एक दिवस गाव बंदला उस्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले.
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील संभाजी शिंदे यांच्यावर मारहाण प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे. या अनुषंगाने येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 21 ऑगस्ट रोजी व्यापाऱ्यांची सभा बोलविण्यात आली होती. सदर सभेमध्ये कोणतेही व्यापाऱ्यांना सक्ती न करता, अत्यावश्यक सेवा वगळता एक सनदशीर मार्गाने एक दिवस बंद पाळण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच सदर गाव बंदचे निवेदन पोलीस निरीक्षक, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांना दिले असून त्याची प्रत तहसीलदार पंढरपूर व ग्रामपंचायत भाळवणी यांना देण्यात आली होती.
सदर निवेदनात, आमच्या गावचे रहिवासी संभाजी शिंदे यांच्यावर गेल्या दहा दिवसापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद केल्याचे समजले होते. संभाजी शिंदे हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून सामाजिक धार्मिक व राजकीय अशा विविध क्षेत्रात काम करीत आहेत. ते शांत स्वभावाचे मनमिळावू व लोकाभिमुख नेतृत्व आहे. म्हणूनच त्यांची श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शासकीय सदस्य पदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची एकूणच कारकीर्द पाहता आजपर्यंत एकही शारीरिक व जिवे मारण्याचा शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद झालेला नाही. तसेच भाळवणी परिसर व तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते वेळोवेळी सहकार्य करतात. आमच्या व्यापारी वर्गामध्ये सुद्धा सातत्याने शांतता राखून सहकार्य करण्याची भूमिका अग्रक्रमाने घेतात. तरी सर्वांना सहकार्य करणारे संभाजी शिंदे यांना या गुन्ह्यातून मुक्तता करावी, त्यासाठी आम्ही सर्व व्यापारी स्वयंस्फूर्तीने दिवसभर शांतता व सुव्यवस्था राखून एक दिवस बंद पाळणार आहे अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले होते.
भाळवणी गावात अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठ, पंढरपूर रोड, सातारा रोड, बस स्थानक ते कारखाना रोड व व्यापारी गाळे येथील व्यापाऱ्यांनी बंद पाळल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांची भावना लक्षात घेऊन संभाजी शिंदे यांना त्या गुन्ह्यातून मुक्तता करावी, अशी मागणी व्यापारी,सर्वसामान्य लोकांमधून होत आहे.