वर्धा प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळ वर्धा अंतर्गत उन्नती लोक संचालित साधन केंद्र वर्धा यांचे मार्गदर्शनात सालोड (हिरापुर) येथे,बचत गटातील महिला ची हिमोग्लोबिन तपासणी 18/08/2023 ला करून घेण्यात आली.. सदर कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दीन चे औचित्य साधुन करण्यात आले.. या कार्यक्रमात 110 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे आज धकाधकीच्या आयुष्यात महिला स्वतः चे आरोग्य जपत नाही .दुर्लक्ष करते.महीला आज विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे..त्यामुळेच हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य तपासणी यांचे माध्यमातून महिलांचे हिमोग्लोबिन चे प्रमाण किती आहे..याची पडताळणी करून कमी हिमोग्लोबिन असलेल्या महिलांना न्युट्री गार्डन ( परसबाग) च्या माध्यमातून महिलांच्या घरोघरी परसबाग चे नियोजन. करून व आहारात सुधारणा करून दर सहा महिन्याने महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती.सहयोगिनी भारती महेंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शनात सागितले.
या कार्यक्रमास आचार्य विनोबा भावे वैद्यकीय रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांनी आरोग्य कॅम्प करिता सहकार्य केले.cmrc वर्धा टीम यांचे मार्गदर्शन व सहयोगीनी भारती वाघमारे मॅडम, व प्रतिभा आधूलकर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.. गावप्रतीनिधी ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सरपंच, उपसरपंच महीला बचत गट, उपस्थित होते.