बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील रूग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षने वेळोवेळी मदत केली आहे. आणि यापुढे ही जिथे रुग्णांचा विषय गंभीर तेथे बारामती शिवसेना वैद्यकीय टीम खंबीर असे मत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे यांनी तेज न्यूज शी बोलताना सांगितले.
यावेळी गावडे म्हणाले,की पेशंटचे नाव अमोल सूर्यवंशी राहणार भोईजं जिल्हा सातारा हे स्पेशल गेली १० ते १५ वर्षे अंथरुणात पडून होते. त्यांना मुख्यमंत्री सहायता माध्यमातून २ लाखाची आर्थिक मदत झाली आहे.अशा अनेक पेशंटला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मान्यवरच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यासाठी व इतरत्र ३५ ते ४० लाखाचा निधी मिळवून दिला आहे. आणि विविध पेशंटला उपचार व मदत केली आहे.
हि मदत मिळाल्याबद्दल सूर्यवंशी पेशंटच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,खासदार श्रीकांत दादा शिंदे,एस डी ओ मंगेश चिवटे व मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत व ज्या व्यक्तीमुळे मला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळाले ते बारामती तालुक्यातील लिमटेक गावचे सुपुत्र सतीश महादेव गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वयक यांचेही ईशानच्या नातेवाईकांनी मन भरून कौतुक केले व आभार व्यक्त केले आहेत.