तावशी प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत' मेरी मिट्टी मेरा देश', 'मिट्टी को नमन, विरोंको वंदन'करण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देशनानुसार महाराष्ट्र शासनाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे मार्फत आज राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्मल ग्राम म्हणून देशपातळीवर सन्मान प्राप्त पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी या गावांमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील स्वातंत्र्य सैनिकांचा तसेच जे स्वातंत्र्य सैनिक आज हयात नाहीत त्यांच्या वीर पत्नींचा यथोचित सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयाचे मानपत्र, पुष्पहार,शाल, श्रीफळ देऊन पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. समाधान (दादा )अवताडे यांचे शुभ हस्ते व तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री. विजयसिंह देशमुख,पंढरपूर उपविभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी श्री. गजानन गुरव साहेब, पंढरपूर तहसीलचे तहसीलदार श्री. सुशील बेलेकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा. आमदार समाधान आवताडे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यासाठी माझ्या व तुमच्या सर्वांच्या जन्मभूमी व कर्मभूमीतील स्वातंत्र्य सैनिकांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेले त्याग व योगदानाबद्दल त्यांचा व वीर पत्नींचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले आहे. तर पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री. गजानन गुरव साहेब म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा खूप मोठी आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान खूप अनमोल आहे. स्वातंत्र्य सैनिक व वीर पत्नी यांच्या भारतमातेच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करता आली ही खूप अनमोल व प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. सदर प्रसंगी पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार श्री सुशील बेलेकर म्हणाले की, तावशी गावाने आज स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम अतिशय वाखाणण्याजोगा व आदर्श असा आयोजित केला त्याबद्दल तावशी ग्रामस्थांना विशेष धन्यवाद दिले. तावशी ग्रामस्थांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी सहकार्य करेन असे अभिवचन दिले. पंढरपूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती माननीय श्री. विजयसिंह देशमुख म्हणाले की, तावशी गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी गोवा मुक्ती आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन मोठी चळवळ उभी केली. तावशी गाव कै.आमदार भाई राऊळ यांचे कार्यकर्तृत्वाविषयी प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय समाधान (दादा )आवताडे, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री .विजयसिंह देशमुख, पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री. गजानन गुरव साहेब, पंढरपूरचे तहसीलदार श्री.सुशील बेल्हेकरसाहेब, तावशी गावचे ज्येष्ठ समाज सुधारक माननीय श्री. बाळासाहेब ( काका) यादव, माननीय श्री. पुरुषोत्तम पवार- पाटील, अॅडव्होकेट श्री.तानाजी सरदार , कार्यक्रमाचे अध्यक्ष तावशी गावचे आदर्श सरपंच माननीय श्री गणपत भानुदास यादव, उपसरपंच माननीय श्री अमोल ज्योती कुंभार,साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. रणदिवे सर, तावशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती सरवदे मॅडम, तलाठी कचरे मॅडम, सर्व ग्रामस्थ,तावशी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विठ्ठल शिखरे, श्री. प्रकाश मोरे,श्री.विष्णू गावडे,श्री.आसबे गुरुजी ,महसुल,आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कचरे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सुभाष भोसले यांनी केले तर आभार श्री.विठ्ठल शिखरे यांनी मानले.