डीबाटू च्या कुलगुरूंची कर्मयोगीला भेट, प्राध्यापकांशी साधला संवाद
पंढरपूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांना कौशल्य आधारित शिक्षण देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या संकल्पनेतून अभियंते घडविणे हेच डीबाटू चे धेय्य आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी (डीबाटू) लोणेरे चे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालया मध्ये त्यांनी प्राध्यापकांशी संवाद साधून त्यांना डीबाटू चे भविष्यातील विद्यार्थी केन्द्रित उपक्रमाविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी महाविद्यालयाची ओळख करून देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा चढता आलेख सादर केला.
याप्रसंगी कर्मयोगी इंस्टीट्यूट चा कॅम्पस व व्यवस्थापन पाहून कुलगुरु डॉ. काळे यांनी विशेष समाधान व्यक्त केले. डीबाटू च्या नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थी हाच केंद्रीभूत मानून राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रमाबादद्ल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा. गणेश बागल, श्री. ओंकार देवडीकर व इतर सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.