पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
आपले दैवत कर्मयोगी श्रधेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त श्री पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या माध्यमातून "भव्य मोफत दंत चिकित्सा व मुखरोग/कर्करोग तपासणी व उपचार शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
सर्वांनी याचा लाभ घेत पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, रूग्ण, जेष्ठ नेते मंडळी, पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, या शिबिराची माहिती आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी.असे आवाहन पांडुरंग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
वेळ - बुधवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २ पर्यंत. स्थळ - टिळक स्मारक मैदान, स्टेशन रोड, पंढरपूर आवश्यकतेनुसार दातांचे आजार आणि त्यावरील उपचार शिबिराच्या दरम्यान त्याच स्थळी केले जातील.अशी माहिती आयोजक प्रणव परिचारक यांनी दिली आहे.