सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस हा स्वावलंबी भारत अभियान यांच्या समवेत साजरा झाला. या कार्यक्रम प्रसंगी पवार सारीज चे व्ही.आर . पवार, धन्य कुमार बिराजदार ( राज्यपाल नियुक्त विद्यापीठ आदी सभा सदस्य तसेच साहित्यिक व प्राचार्य ), श्री ओम इंगले (उद्योजकता विकास यात्रा जिला संयोजक),श्री विनायक बनकापुर (एसबीआई जिल्हा समन्वयक, स्वच्छ गारमेंट व्यवसाय) हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी अध्यक्षीय प्रोत्साहन पर भाषण केले .
या सदर कार्यक्रमात तेजश्री बनसोडे, श्रावणी हीबारे यांनी सूत्रसंचालन केले. कु. गौरी जिंदे यांनी आभाप्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. श्रीकांत जगताप, प्रा. एस. एस. शाखापुरे, प्रा. सुमेध पाठक, प्रा. सुप्रिया कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले,महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.