माळशिरस तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी जयराम घाडगे
महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत अनेकदा महापुरुषांवर भडक वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावणाऱ्या व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात अकलूज येथे योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने शेखरभैय्या खिलारे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही विकृत पद्धतीच्या घटना घडल्या त्या ही घटनांच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करणार आला.मनोहर ( संभाजी भिडे ) या माणसाने महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी यांच्या बद्दल विकृत पद्धतीचे शब्द वापरून तमाम महाराष्ट्राच्या भावना दुखवल्या तसेच मणिपूरम मध्ये महिलेची धिंड काढली गेली आणि बेडग गावामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पडली गेली.
या सर्व घटनांच्या निषेधार्थ अकलूज बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून,अण्णाभाऊ साठे,महात्मा फुले यांना अभिवादन करून चालत निदर्शने करून प्रांताधिकारी अकलूज यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन देसाई मॅडम यांनी स्वीकारले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे,मनोज जगताप,राष्ट्रवादीचे अविनाश सोनावणे,बिपिन बोरवके, जनसेवेचे चंद्रकांत गायकवाड,जय खरे,बच्चन साठे,शिवराम गायकवाड,लखन धाईंजे,इत्यादी सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.