भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रात यंदा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी तिसंगी तलावात पाणी सोडण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी बागल यांनी केली आहे. तसे निवेदन अपर तहसीलदार तुषार शिंदे यांच्या कडे निवेदनात केली आहे.
यावेळी बालाजी बागल म्हणाले की तिसंगी तलावात सध्या जेमतेम २ फूट सुद्धा पाणी साठा राहिलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षभर तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाणी टंचाई भेडसावणार आहे .तसेच नऊ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हि बाब लक्षात घेऊन तातडीने तिसंगी तलावात नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात यावे. नीरा उजवा कालव्याच्या पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील - लाभक्षेत्रात सध्या पाणी आवर्तन चालू असले तरीही ते आवर्तन चालू ठेऊन तिसंगी तलावातही पाणी सोडावे अशी मागणी बालाजी बागल यांनी केली आहे.
यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.