सोलापूर प्रतिनिधी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना देखील इतर शाखांचा देखील अभ्यास करणे आता शक्य झाले असून विद्यार्थ्यांनी ज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज आहे .नविन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असून ज्या विद्यार्थ्यांना इतर ज्ञानशाखेत रस असल्यास तसे शिक्षण घेणे आता सोपे होणार आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्रॅम च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गौरीश नाईक, प्रोफेसर गोवा विद्यापीठ,ज्येष्ठ संशोधक व डी वाय पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, सिंहगड संस्थेचे सहसचिव श्री. संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे,प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी इंडक्शन प्रोग्रॅम चा उद्देश स्पष्ट केला. सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव कटिबध्द असून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आचरण करणे नाविन्याचा ध्यास व कठोर मेहनतीचे महत्व विशद केले.
या इंडक्शन प्रोग्रॅम मध्ये पहिल्या दिवशी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले उमर रंगरेज, आर. टी. ओ. इन्स्पेक्टर अजित शहापूरकर युथ एम्पॉवरमेंट या विषयावर आर. जे अमृत, प्लेसमेंट ची तयारीसाठी डॉ. डॅनियल पेणकर, एन एंगेज्ड इंजिनीरिंग लर्नर या विषयावर प्रा.डी. एम. मेत्री, कला व कलाकार या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.केदार काळवणे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागातून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले शेवटच्या दिवशी प्रा.एम. एस.देशपांडे यांनी येस आय कॅन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रियांका पाटील, वेद गणपुर तर आभाप्रदर्शन डॉ. विनोद खरात यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. रवींद्र देशमुख यांनी काम पाहिले. या इंडक्शन प्रोग्रॅमसाठी एकुण ३२०विद्यार्थी उपस्थित होते.
हा इंडक्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरी जिंदे, स्वरूप आराध्ये, भार्गव कटकम, उदय मोरे, रोहित शालगर, श्रावणी नवले,सृष्टी नवले, आदित्य नक्का, यश सोनवणे, प्रगती पाटील, साक्षांत धोत्रे या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.