आमच्या व्यवस्थेने अडाणी म्हणजे ज्याला लिहता,वाचता येत नाही अशा व्यक्तीस म्हटले आहे. आणि ज्याला लिहता व वाचता येते त्याला साक्षर म्हटले आहे.
माझ्या मते खालील सर्वच व्यक्ती अडाणी असतात.मग तुम्हीच ठरवा मी अडाणी की.........?
1) अंगठा बहाद्दर असूनही शेपूट न घालता जो आपले विचार स्पष्टपणे व परखडपणे मांडतो.तो खरा साक्षर बाकी सर्व............
2) आपल्या समोर अन्याय होतोय.हे पाहून ही आपल काय जातंय ? म्हणणारे तर निव्वळ अडाणी....
3) जुनाट गोष्टी उगाळून लेप तयार करून स्वतःच्या अंगाभोवती फास निर्माण करणारे तर महामहा अडाणी.....
4) स्वतःच्या विचाराला मुठमाती देऊन.दुसऱ्याच्या विचारावर रेघोट्या ओढणारे तर अडाणीच.शिवाय समाज व्यवस्थेच्या उतरंडीतील सर्वात निच्चतम विचाराचे भाडोत्री अडाणी.
5) प्रत्येक गोष्टीत सहमती सहमती म्हणून स्वतः ला नागडे करून घेणारे बेशुद्ध असलेले अडाणीच की..
6) मी बोलण्याने, माझ्या एकट्याने हा बदल घडेल का ? असा स्वतः वरच अविश्वास निर्माण करून घेणाऱ्यांना अडाणी की साक्षर म्हणावे ...?
7) समोर आपल्या मनाविरुद्ध ( समाजमान्य ) घटना, अन्याय व अत्याचार होत असेल आणि आपण दुर्लक्ष करून निघून जात असाल,आपले रक्त शांत असेल व प्रतिकार शक्ती कमी होते आहे असे वाटले की समजावे आपणच निर्लज्ज अडाणी आहोत..
8) प्राणी हे शिकलेले नसतात.ते तर अडाणी असतात.आपली भूक भागली की ते निवांत असतात.परंतू मनुष्य प्राणी असा आहे की भूक भागली तरी प्रचंड मोठी साठवून, नको नको ते मार्ग अवलंबून करत असतो.
भ्रष्ट व अविवेकी मार्गाने मिळवणारे खरच जगातील सर्व प्राणी जगतील सर्वात मंद दगेबाज अडाणी की साक्षर ?
9) दुसऱ्याकडे बोट करून , माफ काढून टिंगल टवाळी करत बसलेले, चांगल्या कामात अडथळा निर्माण करणारे, बेधुंद मद्यप्राशन करून, खरूज आलेल्या प्राण्यांपेक्षा अडाणी असतात..मग ठरवा मी साक्षर की अडाणी...
अडाणी या जगात कोणीच नाही.परंतू ज्याची मती भ्रष्ट झालेली आहे असे ससे ( भित्रे ) सर्वच अडाणी..मग स्वतः च ठरवा मी माणूस म्हणूनच जन्माला आलो आहे तर मी कोणत्या गोटात जायचं की...
*घोटाळ्यात व घोटात माझं माणूसपण झिरपवणार असेल तर रानटी प्राणी ,माझ्यापेक्षा चांगल जीवन जगतो असंच समजा की.*
*स्वतःत स्वतःबद्दल आत्मविश्वास असणे हेच खरे.... विश्व निर्माण करणारे टॉनिक आहे*
लेखन आनंद आलदर