मारापूर प्रतिनिधी
मारापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी राजकुमार यादव व व्हा. चेअरमन पदी अमोल जानकर यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन पर सत्कार करुन पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
गाव-खेड्यातील सामान्य जनतेची अर्थिक संपन्नता कार्यकारी सोसायटी दालनाच्या माध्यमातून उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील पद्धतीने कार्य करा असा मार्मिक सल्ला श्री. आवताडे यावेळी दिला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच विनायकराव यादव, उपसरपंच आशोक आसबे, संचालक राजकुमार आसबे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, माजी उपगराध्यक्ष चंद्रकांत काका पडवळे, शिवसेना तालुकाप्रमुख पै.अशोक चौडे, माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष ,मुरलीधर घुले मेजर, समता पतसंस्था संचालक संजय माळी मेंबर, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड, माजी सरपंच नंदकुमार जाधव, युवा नेते अमोल दादा माने व मारापूर येथिल ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.