पंढरपूर प्रतिनिधी
अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत गेले वर्षभर विविध कार्यक्रम करण्यात येत आहेत. या अनुषंगाने देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या अमृत महोत्सव निमित्त सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २०४७ पर्यंत भारत देश आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामिची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू, भारताची एकात्मिका बलशाली करू, देशाचे संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगु आणि देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू अशा प्रकारची पंचप्राण शपथ घेतली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वय प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.