पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत मुंढेवाडी नगरीच्या माजी सरपंच मा.सौ.शितलताई संतोष मोरे व समस्त ग्रामस्थ मुंढेवाडी यांच्या कल्पकतेने आणि सद्भावनेने नागपंचमी सणानिमित्त मुंढेवाडी येथे आयोजित "हळदी कुंकू व महिला खेळ" कार्यक्रमांसाठी महिला नेत्या अंजलीताई समाधान आवताडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या माता-भगिनींना विविध मनोरंजनात्मक खेळांचे दर्शन घडावे विलक्षण भावनेने आयोजकांनी उपस्थित महिला - भगिनींना अतिशय स्तुत्य कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मा.वहिनींनी आयोजकांचे अभिनंदन करुन कौतुक केले.महिलांचा उत्साह आणि प्रचंड ऊर्जाशक्ती पाहून भारावून गेलो. महिला एकत्रित येऊन सामाजिक उपक्रम राबवून सक्षमीकरण, सबलीकरण करतील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिला- भगिनींना संबोधित करताना व्यक्त केला.
यावेळी राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रातील अनेक महिला मान्यवर व माता-भगिनी आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

