अकलूज प्रतिनिधी
अन्नदान, धनदानापेक्षा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे गरजू रुग्णास वेळेवर रक्त उपलब्ध झाल्याने त्या रुग्णाचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे रक्तदान चळवळ अधिक गतिमान होणे ही काळाची नितांत गरज आहे असे मत व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी "क्रांती दिना" चे औचित्य साधून भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज आणि रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे प्रसंगी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, रोटरी क्लब, अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज तथा अनेक सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक मंडळे यांनी सामाजिक पातळीवर खूप मोठे काम उभे केले आहे हा आदर्श ठेवून रक्तदान चळवळ अधिक गतीमान झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या शिबिराचा प्रारंभ व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड, रोटरी क्लब अकलूजचे अकलूजचे अध्यक्ष रो.ओजस दोभाडा, सचिव रो.कल्पेश पांढरे, रक्तदाते पारस खडके, श्रीमंत बर्वे यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलानाने झाला.
याप्रसंगी रक्तदाते पारस खडके यांनी मनोगत व्यक्त करताना मीही शिबिराच्या माध्यमातून तथा आपत्कालीन स्थितीत गरजू रुग्णास अनेक वेळा रक्तदान केलेले असून या निमित्ताने आपण समाजाच्या उपयोगी पडू शकतो या गोष्टीचा मला अभिमान वाटतो असे सांगितले.
या शिबिराप्रसंगी 42 व्या वेळा रक्तदान करणारे रक्तदाते किशोर घोडके आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत एकोणिसाव्या वर्षी पहिल्यांदा रक्तदानाचा शुभारंभ करणारे त्यांचे चिरंजीव करणराज घोडके या पिता-पुत्रांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या शिबिरामध्ये किशोर घोडके, करणराज घोडके, अभिजीत वाघमारे, सुजय इंगवले, ऋषिराज शिंदे, श्रीमंत बर्वे, आकाश सोनटक्के, सौरभ भरते, विश्वजीत मगर, यश कदम, ज्ञानदीप जवंजाळ, दर्शन उपाध्ये, अथर्व गोडसे, कांतीलाल सपकाळे, दत्तात्रय घाडगे, विश्वजीत जगताप, हणमंत घोडके, प्रवीण निर्धार, मंगेश पवार, संतोष नागणे, संतोष मुळे, इमदाद मुलाणी, सुकुमार भगत, ओंकार ननवरे, अनिरुद्ध शिंदे, बाळासाहेब होले, प्रवीण पवार, ओम स्वामी, स्वप्निल रणवरे या 29 रक्तदात्यांनी रक्तदान करून पवित्र सामाजिक कार्यास हातभार लावला.
या प्रसंगी डॉ.संतोष खडतरे, रो.अजित वीर, रो.महादेव मगर, किरण भगत , अवधूत वडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवर व उपस्थितांचे स्वागत रो.ओजस दोभाडा यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे प्राचार्य व रोटरी सदस्य गजानन जवंजाळ यांनी केले तर आभार ओंकार गोंदकर यांनी मानले. शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेच्या स्टाफचे विशेष सहकार्य लाभले.