पंढरपूर प्रतिनिधी
अवैध वाळु चोरी करणा-या विरूध्द कारवाई करून १७, २४, ०००/- रू किमतीचा मुद्वेमाल हस्तगत करण्यात आला.
दि ०६/०८/२०२३ रोजी पहाटे ०५/०० वाजण्याचे सुमारस मौजे चिंचोली भोसे ता. पंढरपूर भिमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळु चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे पथकाने सदर ठिकाणी छापा घालून ०३ ट्रक्टर वाहन डंपीगट्रॉली ०३ ब्रास वाळुसह आरोपी नामे १) धनाजी रामकृष्ण पवार, २) अनिल लक्ष्मण पवार, ३) गणेश बापु सोनवणे तिघे रा. चिंचोली भोसे, ४) राजु चंद्रकांत शिकतोडे रा. गुरसाळे यांचे विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ५५४ / २०२३ भादविक ३७९, ३४ गौण खनिज कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक / क्षिरसागर हे करीत आहेत.
दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्रौ १०/४० वाचे सुमारास गोपनिय बातमीदार यांचेमार्फत माहिती की, मौजे शेगाव दुमाला येथील भिमा नदी पात्रातुन पिकअपच्या सहायाने अवैधरित्या वाळु चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील बिट अंमलदार यांनी छापा टाकुन ०१ पिकअप वाहन ०१ ब्रास वाळूसह अज्ञात अरोपी विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ५६२ / २०२३ भादविक ३७९, ३४ गौण खनिज कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार / घंटे हे करीत आहेत. असा एकुण दोन्ही गुन्हयात एकुण १७, २४, ०००/- रू किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी ही अर्जुन भोसले, मा उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षफ, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन खाली पोकाँ/ शिवशंकर हुलजंती, पोकों/ राहुल लोंढे, चापोकों / मुजावर सर्व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे पथक तसेच पोहेकॉ / इसाक सय्यद, पोना / विनायक क्षीरसागर, पोकों/ बालाजी कदम पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.