सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ॲक्सेलेरेट इन्कुबेशन अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडन्ट अँड फॅकल्टी - सुरवातीच्या टप्प्यातील उद्योजक 'या विषयावर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल तर्फे सेमिनार आयोजित केला.
या कार्यक्रम प्रसंगी मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. रवींद्र व्यवहारे , आय.आय.सी प्रेसिडेंट प्रा.श्रीकांत जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सुमेध पाठक यांनी विषयावरती मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना इंक्युबॅशन सेंटर साठीच्या उपलब्ध संधी याबद्दल विचार मांडले. यासोबतच इजिप्त मध्ये इंक्युबॅशन कशा प्रकारे वाढत आहे आणि त्याचा फायदा स्टार्टअप साठी कशाप्रकारे करून घेता येईल, सोबत इंटरप्रिनरशिप इकोसिस्टीम त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स जसे की पॉलिसी फायनान्स कल्चर सपोर्ट ह्यूमन कॅपिटल मार्केट याबद्दल माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेश शेटे,महेश कोळी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.हा कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले आणि सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले यांनी प्रोत्साहन पर अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया विभुते तर आभार प्रदर्शन कोमल आवताडे या विद्यार्थ्यांनी केले.