पळशी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8.30 च्या सुमारास 22 वर्षीय युवकाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मयत सोमनाथ वसंत माने हा आपल्या विजय लोखंडे व दीपक मस्के या दोन मित्रांसोबत शिंदी पिण्यासाठी गेले होते.देविदास वाघमारे या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन शिंदी पिऊन परत येत असताना सोमनाथ यास लघुशंकेसाठी गाडी उभी केली असताना लघुशंका करण्यास खाली बसल्यानंतर त्याचा तोल गेला .चक्कर येऊन खाली पडला म्हणून दीपक व विजय या दोघांनी त्यास उपचारासाठी उपरी येथील डॉ.लोखंडे यांचेकडे नेले असता त्यांनी पंढरपूर ला कॉटेज हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले .दरम्यान सोमनाथ चे मामा बाबा भोसले,शाहीर भोसले व आई बाळाबाई यास सांगितले असता ते तात्काळ पंढरपूर येथे शासकीय रुग्णालयात हजर झाले.तो पर्यंत वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून सोमनाथ ला मयत जाहीर केले होते.
त्यानंतर मामा बाबा भोसले यांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे जाऊन सोमनाथचे मयत संदर्भात माहिती दिली. शवविच्छेदनानंतर मयत ताब्यात घेऊन सोमवारी पहाटे 4.00 च्या दरम्यान अंतिम संस्कार करण्यात आले.
मंगळवार सकाळी सात वाजता माती सावडण्याच्या विधीसाठी जात असताना गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,नेते मंडळी यांना बोलाविण्यात आले.ग्राम पंचायत सर्व सदस्य ,सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक ,पोलीस पाटील यांना बोलावून ग्राम पंचायत कार्यालय या ठिकाणी ठिय्या मांडला आणि गावातील दारू बंदी झाली पाहिजे व मयताची मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी असा आक्रमक पवित्रा लोकांनी घेतला.दरम्यान पोलीस बीट हवालदार संतोष जगताप ,सुनील जाधव घटनास्थळी पोहोचले.परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते तरी पण सर्वांच्या आग्रहास्तव सर्वांना आश्वस्त करण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेच्या परि पोलीस उपअधीक्षक रोहिणी बनकर या तात्काळ हजर झाल्या आणि सर्वांना दारूबंदी करण्यासाठी आश्वस्त केले व या संबंधी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी गावातील महिलांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या त्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती.गावातील स. शि.वसंतराव काळे स. सा.कारखान्याचे संचालक गोरख जाधव, मा.सरपंच रघुनाथ झांबरे,बाळू शेवाळे,सरपंच पूजा वाघमारे,रामदास वाघमारे,उपसरपंच अशोक शिंदे,विजय राजमाने,दिगंबर वाघमारे,कांता माने,प्रा.मारुती जाधव,रोहिदास वाघमारे,मल्हारी वाघमारे, गोपाळ झांबरे,जोतीराम झांबरे,शिवाजी लोखंडे,मोहन वाघमारे,बापू सातपुते, पै.मारुती झांबरे,नवनाथ वाघमारे,सुभाष वाघमारे,श्रीशैल्य पाटील,सुनील लोखंडे व इतर शेकडो ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
मयत सोमनाथ माने यांचा शवविच्छेदन अवहाल प्राप्त झाला असून मृत्यू हार्ट अँटक मुळे झाला असल्याचे रिपोर्ट आले आहेत.
रोहिणी बनकर
परि पोलीस उपअधीक्षक पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशन