सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्हा ड्रॉप रोबॉल असोसिएशन व समर्थ स्पोर्ट्स नर्सरी यांच्या सयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या औचित्याने ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व खेळाडुंचा कृतज्ञता सोहळा मुळे पँव्हेलियन येथील टेबल टेनिस हॉलमध्ये संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी एम.के शहापुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल कुंभार यांच्या हस्ते प्रकाश कादूळे प्रकाश भुतडा, राजेंद्र माने मरगू जाधव, नासीर आळंदकर, चंद्रकांत रेम्बुसू, झुबीन आमारिया, राजेंद्र गोटे, झेड.एम.पुणेकर, सुवर्णा कांबळे,अक्षय माने या मार्गदर्शक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष विठठल कुंभार म्हणाले, गुरुबद्दल आदर व निष्ठा ठेऊन काम केल्यास यश प्राप्ती होते म्हणून जीवनात गुरूचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. गुरुच आपल्याला चांगले शिकवण देत असतात. प्रा.काटुळे म्हणाले,गुरु आणि शिष्यांच्या चांगल्या सुसंवादाने चांगले शिष्य घडत असतात.गुरुकृपेने शिष्य आपल्या जीवनामध्ये यशाची शिखरे गाठतो. म.न.पा क्रीडा अधिकारी एम.के शहापुरे यांनी खेळाडूंना सोलापूरच्या नाव लौकिकासाठी शुभेच्छा दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर प्रसन्न काटकर यांनी आभार मानले.

