सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी हायड्रॉलिक फ्लोअर क्रेन बनवले असून यामध्ये जे सामान्यत: औधोकिक सेटिंग्जमध्ये वापरले जाणारे बहुमुखी उपकरण आहे. या क्रेनची रचना उच्च वजन क्षमता, कुशलता आणि सुरक्षितता वैशिठ्यासह केली केली आहे.
या प्रकल्पामध्ये लोड आवश्यतांचे विश्लेषण, योग्य सामग्रीची निवड , हायड्रॉलिक प्रणालीची रचना आणि क्रेन घटकांची निर्मिती यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी अंतीम उत्पादनाची गुणवत्ता कार्यक्षमता आणि विश्र्वाहर्ता सुनिश्चित कण्यासाठी कठोर चाचणी घेण्यात आली. या प्रकल्पाला यशस्वी पूर्ततेमुळे विवीध लिफ्टींग ॲप्लिकेशनसाठी कार्यक्षम आणि किफायतशीर हायड्रॉलिक फ्लोअर क्रेनचे परिणाम दिसून आले.
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अशितोष आवसेकर, प्रतीक पुतळे, प्रसन्न जाधव, जय हिबरे, रवी धर्मशाळे, आदर्श म्हणता, प्रसाद कलदीप, ओंकार महाडिक यांनी परिश्रम घेतले असून प्रा. कौस्तुभ मंगरुळकर व प्रा. शशीकांत लामकाने यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

