थकबाकीदार लाभार्थ्यांनी लाभ घेवून कर्जमुक्त होण्याचे आवाहन
सोलापूर प्रतिनिधी
ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ओटीएस) योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
त्याअनुषंगाने महामंडळाच्या योजनेतील थकबाकीदार लाभार्थीनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थपक यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयास भेट द्यावी.

