पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित जनस्वराज्य यात्रा माढा लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 8 वा श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर येथुन मा आ महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातुन सुरुवात होऊन दि 10 आणि दि 11 हे दोन दिवस माढा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातुन शेकडो चार चाकी गाड्यांच्या ताफ्यात राॅली जाणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मिशन माढा लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक शक्तीस्थळांना अभिवादन करत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या राॅलीचे सभेत रूपांतर होऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा कार्यक्रम भव्य दिव्य पध्दतीने पार पाडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात या राॅलीचे स्वागत करत यात सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मासाळ यांनी केले आहे.

