ग्राहक पंचायतीच्या मागणीस एस. टी. चा सकारात्मक प्रतिसाद.
अकलूज प्रतिनिधी
गोंदावले येथे नेहमीच भाविक भक्तांची गर्दी असते. माळशिरस व अकलूज परिसरातील सर्वसामान्य भाविकांसाठी गोंदावले प्रवास सुकर व्हावा याकरिता ग्राहक पंचायत माळशिरस यांचे मार्फत प्रवासी ग्राहकांनी अकलूज डेपो यांना निवेदन दिले होते.
यावर एस टी महामंडळाने सकारात्मक भूमिका घेऊन प्रवाशांच्या सोईसाठी दर रविवारी सकाळी 9:00 वा अकलूज येथून बस सुरू केली आहे,ही बस माळशिरस म्हसवड मार्गे गोंदवले येथे जाईल .
ही बस दुपारी २:१५ वा गोंदवले येथून परत त्याच मार्गाने परत येईल.या मार्गावरील सर्व प्रवासी ग्राहकांनी व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत व एस टी महामंडळाने केले आहे.

