सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल यातील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला 'नोमान शेख' याने ३ नामांकित कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या तीनही कंपनीमध्ये 'नोमान शेख' याची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घडवले जातात.
यामध्ये कंपनीला आवश्यक असणारे ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेतली जाते. या परिश्रमामुळेच सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालया तील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत. चालू शैक्षणिक अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच नोमान शेख याची 'हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड' - वार्षिक पॅकेज ८.३ लाख रुपये, ' जाबिल ' - वार्षिक पॅकेज ६ लाख रुपये आणि 'लक्ष्मी हायड्रोलिक्स लिमिटेड' - वार्षिक पॅकेज १.२ लाख रुपये या तीन नामांकित कंपनीमध्ये निवड झाली.
नोमान शेख या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य तथा मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.विकास मराठे, डॉ. प्रदीप तपकीरे, डॉ. दत्तात्रय गंधमल, प्रा. विजय बिरादार, डॉ. विनोद खरात आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

