सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना चंद्रयान ३ उड्डाणाचे प्रक्षेपण प्रोजेक्टरद्वारे दाखवण्यात आले.प्रशालेतील १०० विद्यार्थ्यांनी थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला .
शुक्रवारी,श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्चिंग पॅड हून चंद्रयान 3 चे प्रक्षेपण दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी करण्यात आले.यावेळी प्रशालेतील विज्ञान शिक्षक शिवकुमार शिरुर यांनी चंद्रयान व उड्डाण यासंबंधीची माहिती सांगितले. विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर असे या रॉकेट मधील दोन महत्त्वाचे भागासह चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे नोंद घेणे, चंद्राच्या खनिज व रासायनिक रचनेचा शोध घेणे, डोंगर मातीचे परीक्षण करणे हा या मोहिमेचा उद्देश स्पष्ट केले. तापमानाचे अध्ययन करणे हे चेस्ट चे काम ,दुसरे रंभा उपकरण अणु घटकांच्या घनतेची नोंद घेणे, तिसरे इलसा उपकरण चंद्राच्या भूकंपा संबंधी घडामोडी यांचा अभ्यास करणे, एल आर ए उपकरण चंद्र पृथ्वीचे अचूक अंतर मोजणे आणि याशिवाय रोव्हर मध्ये आणखी दोन उपकरणे आहेत .लिब्ज हे चंद्राच्या खनिज व रासायनिक रचनेचा शोध घेईल आणि अपेक्स उपकरण डोंगर मातीचे परीक्षण करेल असे माहिती सांगत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना चंद्रयान तीन चे उड्डाणाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले . यातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरेल अशी अपेक्षा प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी व्यक्त केले.यावेळी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, प्रयोगशाळा सहाय्यक विनायक कोरे उपस्थित होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला .यातून मनापासून आनंद मिळाल्याचे शाळेतील विज्ञान शिक्षक श्री शिवकुमार शिरूर यांनी सांगितले.

