सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये श्री. सुरेश तेलकर हे दिव्यांग असून, त्यांना पिको-फॉल मशीन व तसेच सौ. उषा क्षीरसागर आणि सौ. अश्विनी माळवतकर या दोन्ही महिला अत्यंत गरीब व गरजू परिस्थितीत असून शिलाई काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना शिलाई मशीनची अत्यंत आवश्यकता असल्याची खात्री समाजातील मान्यवरांकडून करण्यात आल्यानंतर त्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली.
या तिन्ही लाभार्थ्यांना भावसार व्हिजन इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. मनीषजी सूत्रावे यांच्या हस्ते शिलाई मशीन प्रदान करण्यात आली. यावेळी देवी देवाची ट्रस्टचे ट्रस्टी श्रीकांत अंबुरे तसेच गव्हर्नर श्रीराज निकते अध्यक्ष सुशील महिंद्रकर सचिव अभियंता सागर पुकाळे खजिनदार प्रभाकर कुसुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलच्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या भावसार व्हिजन इंडियाच्या सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री अश्विन डोईजोडे, राजेश झिंगाडे, सुहास क्षिरसागर, सिद्राम हंचाटे, प्रभाकर जवळकर, लक्ष्मीकांत मुसळे, किरण मुसळे, रविकिरण वायचळ, किरण पुकाळे, पुनम पुकाळे किरण रणसुभे, दीपा उपरे, माधुरी लोकरे इत्यादी जण अधिक परिश्रम घेतले.

