संत शिरोमणी सावता महाराज
जन्म : - १२५० ,समाधी: - १२९५
*विचार धन सावतोबांचे*
ज्येष्ठ वैष्णव ,संत शिरोमणी, कर्मप्रधान भक्तिमार्गाचे प्रणेते, प्रवृत्ती मार्गी शिकवणीने आणि नामसंकीर्तनाच्या मार्गाने अध्यात्मिक प्रगतीची अमृतसंजीवनी समान्यभक्तजनांना प्राप्त करून देणारे सावता महाराज वयाने, अध्यात्मिक व पारमार्थिक क्षेत्रातील अधिकाराने व अनुभवाने ज्येष्ठ होते.त्यांनी दिलेले अध्यात्मिक विचारधन पुढील प्रमाणे सांगता येईल.
*आपले वहीत कर्तव्य आणि कर्म सतत आत्मीयतेने करीत रहाणे हीच ईश्वराची खरी भक्ती आहे.
*मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट्य मोक्ष मिळविणे असून , हा मोक्ष आपले विहित कर्तव्य व कर्म केल्याने सहजासहजी मिळतो.
*सतत केवळ परमेश्वराचे नामस्मरण केले तरी परमार्थ साधता येतो.त्यासाठी संसार सोडून संन्यास घेण्याची आवश्यकता नाही.
*परमेश्वर प्राप्तीसाठी योग-याग,जप-तप व तिर्थ व्रत यासारख्या वरपांगी व दिखाऊ गोष्टींची बिलकुल आवश्यकता नाही.
*नामसंकीर्तन करणाऱ्याने भुक्ती (भोग) व मुक्ती ( मोक्ष ) यांची पर्वा करण्याचे कारण नाही , कारण विठ्ठल नामाच्या बळावर यमाच्या माथ्यावर सोटा मारता येतो आणि वैकुंठीचा देव किर्तनी आणता येतो.
*पंढरीची नित्य वारी केली नाही तरी देखील केवळ नामसंकीर्तनाचे बळावर वैकुंठाची वाट सापडू शकते.
*पंढरीच्या पांडुरंगामध्ये शिव, ब्रम्हा व विष्णू हे तिन्ही देव एकरूप झाले आहेत.
अशाप्रकारे जीवन करे जगावे याचा आदर्श सावता महाराजांनी लोकांसमोर ठेवला आहे.प्रपंच नेटका करून परमार्थ कसा साधता येतो , याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. संत शिरोमणी सावता महाराजांचे जीवन होय.सध्याच्या आधुनिक युगात जो कोणी श्री. संत सावता महाराजांची सन १३ व्या शतकात दिलेली कर्मप्रधान व प्रवृतिमार्गी अध्यात्मिक शिकवण निष्ठापूर्व अंगीकारिल त्याचा निश्चिपणे उद्धार होईल व त्यांचे जीवन पावन होईल.
----------------------------------------
संत शिरोमणी सावता महाराज सप्तस्मृती शताब्दी समिती (१२९५ ते १९९५)
विशेष उपक्रम
समकालीन संतांच्या ७००व्या पुण्यतिथी निमित्ते विविध उपक्रम राबविण्यात आले. सातशेहून अधिक मंदिरामध्ये पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.या कलावधीमध्ये ७०० भाविकांनी श्री.संत शिरोमणी सावता महाराज महात्म्य ग्रंथाचे वाचन करण्यात आले.सावता सागर ज्योतीचा ७००किलोमीटर अरण ते नांदगिरी सातारा ज्योत प्रवास संपन्न केला.संजीवन समाधी परिसरामध्ये ७०१दिव्याचे प्रजवलन करण्यात आले.सन १९९६ ला संत शिरोमणी सावता महाराज सप्त स्मृती शताब्दी वर्षानिमित्त तीर्थक्षेत्र अरण येथे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती व अरणचे महात्म्य सोलापूर आकाशवाणी वरून प्रसारित करण्यात आले, यावेळी श्री विठ्ठलराव शिंदे सरपंच अरण व ट्रस्टचे सचिव सुधाकर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.सांगता समारंभ कार्यक्रम अरण येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शन वरून प्रसारण झाले.
संत शिरोमणी सावतामहाराज सप्त स्मृती शताब्दी समितीचे विशेष उपक्रमहे श्री संपतराव जाधव यांच्या विचारांशी सहमत राहून करण्यात आले , यासमिती मध्ये प्रामुख्याने श्री एकनाथ वाघ,डॉ. मधुकर जाधव, श्री भानुदास कोरडे, सौ.रत्नप्रभा नाळे,श्री शिवराम बोराटे,श्री किरण भुजबळ,श्री भगवान गोरे, श्री दत्तात्रय भुजबळ, श्री बापू सूळ, डॉ. सौ सुरेखा यादव, श्री प्रभाकर देवकर ,डॉ. नारायण बनसोडे यांनी समितीच्या उपक्रमा करिता विशेष सहकार्य केले.
सावता सत्कार (३० जानेवारी २०११)
ज्या मानवी देहाने सावता हे नाव धारण केले आशा सावता नावाच्या ५३८ सावता नावाच्या व्यक्तींचा कांदा, मुळा, भाजी व विळा सन्मानपत्र देऊन संजीवनी समाधी समोर सत्कार करण्यात आला.या सावता सत्कार समिती पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री संपतराव जाधव , सौ. शीला माळी कोल्हापूर, सौ.अमिलता शिंदे, लातूर,श्री हेमंत ढोले, पुणे,सौ.सुमन ताटे सोलापूर, सौ.अलका चांदणे पुणे, सौ वैशाली गुंजकर नांदेड, विद्या कुदळे नवीमुंबई, श्री तुकाराम डबाणे, चिपळूण ,श्री अशोक माळी उस्मानाबाद, श्री अमर बोराटे इंदापूर, या अजित जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
चंदन उटी यात्रा १८एप्रिल २०१२
तीर्थक्षेत्र अरण या ठिकाणी वर्षातून दोन यात्रा असतात, एक चंदन उटी यात्रा व पुण्यतिथी निमित्ताने भणारी भव्यदिव्य यात्रा असतात.चंदन उटी यात्रा जनसामान्य पर्यत ज्ञात व्हावी या करिता व संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे प्रकाशन व विनामूल्य वितरण करण्यात आले.या करिता प्रामुख्याने श्रीसंतोष खांडेभराड ,देऊळगावराजा, श्री विश्वनाथ तोडकर औरंगाबाद, सौ.उज्जवला नाळे चिपळूण, श्री संदीप नाईक, नारायणगाव , श्री सनी रगाडे खंडाळाया संतप्रेमीचे सहकार्य लाभले.
तीर्थक्षेत्रअरण दर्शन सोहळा २६ जुलै २०१४
संत शिरोमणी सावता महाराज यांचे वेगळेपण त्यांच्या वृत्तीतून व कृतीतून दिसून येते.सावता महाराजांच्या कर्मप्रधान व भक्तिमार्गी शिकवणीचा आणि जीवनकार्याचा परामर्ष घेतला असता त्यांची जीवनदृष्टी पुरोगामी होती तर शिकवण कर्व्यनिष्ठतेला व सामाजिक नैतिकतेला पोषण होती.या विचारांचा प्रसार व प्रचार या उद्देशाने संत सावता महारांजाची प्रतिमा प्रकाशन व प्रतिमेचे वितरण करण्यात आले.
दिशा दर्शक फलक
तीर्थक्षेत्र अरणच्या चारही दिशांना दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले.यामध्ये शिखर शिंगणापूर परिसर, माळशिरस, माळीनगर,टेम्भुर्णी, पंढरपूर, डीग्गेवाडी, शेटफळ, मोडनिंब, माढा, कुर्डुवाडी व अरण याठिकाणी संतप्रेमीच्या सहकार्याने दिशादर्शक लोखंडी बोर्ड लावण्यात आले.या कालावधीमध्ये वाडी वस्तीस ,संत सावतामाळी नगर असे नामकर उपक्रम राबविण्यात आले.समितीच्या वतीने विठ्ठल पालखी मार्गावर दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले.त्याचप्रमाणे तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्ष श्री बाबुराव जाधव यांच्याकडे विठ्ठल पालखी मार्गावर डांबरीकरण प्रस्ताव मांडून डांबरीकरण काम पूर्ण करुन घेतले. जनसमान्यपर्यत संत साहित्य पोहोचविण्यात आले.समितीच्या विनंती पूर्वक मागणीनुसार दि सासवड शुगर फॅक्टरी माळीनगर यांनी समितीकडे दिन हजार संत सावता महाराज ग्रंथ सुपूर्त केले व समितीने संतप्रेमी पर्यत वितरित केले.समितीच्या विविध उपक्रमांना श्री राजेंद्र गिरमे, श्री शंकर लिंगे, श्री गणेश अण्णा झगडे श्री मोहन बनकर, श्री खंडू मोहोळकर, श्री देवेंद्र बनकर ,श्री शंकर येडेकर, श्री पांडुरग नामदे , श्री विश्वनाथ झाम्बरे, श्री अप्पसो बोराटे , श्री मोतीराम कर्णे, सौ अलका शर्मा ,श्री बळीराम शेवते, श्री भीमराव वसेकर, श्री अंकुश वसेकर ,श्री वसंतराव वसेकर, श्री रमेश वसेकर, श्री सुभाष देवमारे, श्री बापूराव यादव , सौ अनिता घनवट , सौ निर्मला घनवट ,सौ सरस्वती शिंदे ,सौ शशिकला जाधव , श्री रघुनाथ पिसे, श्री संतोष जमदाडे, श्री सावता शेंडे, श्री संतोष ननावरे, श्री धनाजी राऊत ,श्री सावता शेवते, श्री मस्कु बोडके, श्री कुंडकील घोडके, श्री ज्ञानेश्वर फुले , सौ मंगल शेवकरी, सौ प्रतिभा माळी, सौ कमल हिंगणे, सौ तारका विवरेकर ,सौ ललिता माळी, सौ शुभांगी माळी, सौ सुनीता माली, श्री मामा जाधव, श्री सचिन ननावरे , श्री अण्णा जमदाडे, सौ ज्योती राऊत, सौ विद्या जमदाडे, सौ कमल ओव्हळ, सौ शुभांगी राजगुरू, श्री लक्ष्मण घनवट ,श्री किशोर वाघ, श्री वसंत देवमारे, दामाजी माळी या संतप्रेमीनी बंधुभगिनींनी समितीस तनमनधनाने सहकार्य केले.
अरण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी त्याच बरोबर संत प्रेमींसाठी बसस्थानक व्हावे, भाविकांना सुखसुविधा उपलब्ध याबाबत समिती सतत आग्रही राहिली.संजीवन समाधी समोर अखंड वीणा सेवेकरिता सहभाग.समितीच्या उपक्रमास संत सावतेबुवा देवस्थान ट्रस्ट,अरण सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत अरण , संत सावता महाराज माध्यमिक विद्यालय, श्री विठ्ठल पालखी मानकरी कुलकर्णी परिवार ,अरण येथील महिला मंडळ, युवा मंडळे व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कर्मप्रधान कृतिशील विचारांचा वसा व वारसा जोपासना करण्याकरिता संत साहित्याचा प्रचार व प्रसार कार्य अविरतपणे सुरू आहे .
अजित जाधव
९७३०९७०१८२/९५७९३४४१७७

