आज शनिवार प्रथम पुण्यस्मरण समाधी सोहळा
करकंब गावाचे भुषण आणि ज्यांनी आपली हयात सिध्दनाथाच्या सेवेत घालवून करकंब गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण करुन सर्व तरुण वर्गाला आध्यात्मिक आवड निर्माण करणारे,संत सावता महाराजांचे निस्सीम भक्त आदरणीय पूजनीय बजरंगतात्या महाराज (वय १००), लहानपणी शेतात काम करुन चरितार्थ भागवायचा,शेतात कामाला जाणे,विहीर खोदकाम करणे,अशी कितीतरी वर्ष काबाडकष्ट करून मनातील आध्यात्मिकतेची ओढ अगदी श्री सिद्धनानाथाचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि सुरुवात झाली,सिध्दनाथाची करत असलेली दैनंदिन पूजाअर्चा आणि सेवा करत असताना आप्पा टिळेकर यांच्या शेतात येत असलेले पिंपूडखुर्द (सातारा)येथील संत अवलिया गणपत महाराज यांनी तात्या करत असलेली सेवा पाहिली आणि तात्यांना अध्यात्म म्हणजे काय आणि सगुण साकार शिवाची भक्ती कशी करायची,ते सांगून तात्यांना अनुग्रह दिला,आणि गुरुंचा परिसस्पर्श झाला, आणि आध्यात्मिक तपश्चर्या सुरू झाली, आध्यात्मिकतेकडे कल वाढला,आणि तपश्चर्या सुरू असताना माणसात असले तरी आणि नसले तरी त्यांचा एकांत मात्र शिवनामातच सतत राहायचा,आणि अशातच श्री सिध्दनाथाचे करकंब गावी ७० वर्षापूर्वी सिध्दनाथ मंदिराची मुहूर्त मेढा रोवली होती तीही हळूहळू पुर्णत्वास जात होती,त्या काळात कोण इंजिनिअर नव्हता स्वतः काम करत अनेक दगडफोडी गवंड्यांच्या गुलाब चौगुले,पुतण्या भोजलिंग मारुती पिसे यांच्या मदतीने दररोज थोडं थोडं मंदिर बांधायला सुरुवात केली, तो शेवटच्या श्वासापर्यंतच,खरं पाहता तात्या कीर्तनकार प्रवचनकार,गायक,वादक, नव्हते, परंतु त्यांना स्वतः बरोबरच सर्वांनी या अध्यात्मात येऊन ब्रह्मानंद मिळवावा असं वाटतं असताना अनेक शिष्यांना अनुग्रह देऊन आध्यात्मिक ओढ लावली ती शेवटपर्यंत,अशा या खडतर वाटचालीतून अरण येथील संत शिरोमणी सावता माळी आणि संत नामदेव महाराज यांच्या समाधी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू करुन लोकांनाही कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी प्रवृत्त केले,आणि भव्यदिव्य श्रीफळ हंडीलाही सुरुवात केली आज एक करकंब मधील मोठी श्रीफळ दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे त्याद्वारे भागवत धर्माची पताका फडकवली,त्याच काळात लोक मंदिराकडे यावीत यासाठी दररोज अन्नदान ही चालू झाले,वरचेवर लोक येऊ लागलं, त्यानंतर श्रावण महिन्यात नागपंचमीच्या काळात महिलांसाठी झोके बांधून ,मंगळागौर,तयार करुन महिलांना एक आनंदाची पर्वणी होत होती,अशा काळातच सप्ताह आणि विविध कार्यक्रमांना वाडी वस्तीवरील लोकांना यायला पाऊस पडल्यानंतर चिखल होत होता आणि येण्याजाण्यासाठी रस्ता नव्हता तरी त्यांच्या आशीर्वादाने लोकवर्गणीतून मंदिराच्या चारी बाजूंनी मूरुम टाकतं लोकांना भक्तांना येण्याजाण्याची सोय करुन दिली,आपल्या वस्तीवरील काही मुलं कीर्तन प्रवचन गायक वादक बनावीत यांसाठी काही मुलांना आळंदी येथीलवारकरी शिक्षण संस्थेत स्वतः पदर खर्चाने पाठवून त्यांना स्वतः घ्या पायावर उभे केले,ते आज मितीला वारकरी सांप्रदायाची पताका फडकवत आहेत त्यांमध्ये बळीराम व्यवहारे,राणी सिदवाडकर,श्रीहरी साळुंखे,ओंकार व्यवहारे , देविदास काटवटे ही उदाहरणे असतानाच करकंब मध्येही मोहन बापू पाटील यांना मुलांवर संगीताचे संस्कार व्हावेत यासाठी संगीत वर्ग सुरू केले ते आज मितीला ही चांगल्या पध्दतीने चालू आहेत,अशातूनच संत सावता माळी वारकरी संस्थेची निर्मिती केली.
त्यातून अनेक विद्यार्थी घडत आहेत,तसेच मंदिराचा दररोजचा खर्च कायमस्वरूपी भागवण्यासाठी स्वतःच्या २४ एकरात चिंचेची झाडे लावाली,आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं रक्षण आणि मंदिराची दुरदृष्टी ठेऊन खर्च कायमस्वरूपी भागवण्यासाठी या चिंचेच्या झाडांचा कायमस्वरूपी उपयोग होतो आहे,तसेच त्यांना स्वच्छतेची ही खुप आवड होती, प्रत्येक ठिकाणी जाऊन मंदिराची स्वच्छता केली,हे करीत असतानाच कुठल्या मंदिराची पडझड झालेली बघितली की त्या मंदिराचा हमखास जिर्णोद्धार व्हायचा अशातच करकंब येथे महादेव मंदिर शिखराचे काम, शिंगणापूर येथील वेशीच बांधकाम,माढा तालुक्यातील मारुतीचे मंदिराचा जीर्णोद्धार, बार्डी येथील मारुती जानूबाई मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मठातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली,जाधववाडी येथील मारुती मंदिर बांधले, हनुमान गडावर मारुतीचे मंदिरनव्याने बांधले,तसेच वाफळकरवस्तीवरील अप्रतिम मारुती मंदिर दगडी बांधले,टेंभी वरील महादेव आणि मारुतीचे मंदिर बांधले,हे करीत असतानाच करकंब गावच्या वतीने त्यांना मानाचा करकंब भुषण पुरस्कार ही प्राप्त झाला,हे करीत असताना भक्तांमध्ये अंधश्रद्धा बाळगू नका,देवमाणसातच आहे, अन्नदान करा,अडचणीत असलेल्यांना मद्य करा, वादविवाद टाळा,मोठ्यांचा आदर करा व, आईवडीलांची सेवा करा,असा संदेश कायम देत असत, भविष्यकाळातील येणाऱ्या अडचणी ओळखून महत्वपूर्ण नियोजन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती.एखाद काम हाती घेतल्यावर त्याचा शेवट होईपर्यंत ते काम सोडत नव्हते,तात्या कधीही एका जागी थांबत नव्हते चल इथल्या मंदिरात,चल शिंगणापूरी,चल औंढा नागनाथ ला सर्व शिष्यांना बरोबर घेऊन सतत देवदर्शनासाठी फिरती असायची,दैवी शक्ती असणारे तात्या आज सर्व भक्तांना सतत उपदेश देत असत,त्यांच्या पश्चात तात्यांच्या अध्यात्मिक गादीवर ह.भ.प.तात्यांचे नातू सुदाम महाराज पिसे,यांना बसवले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यकाळात तरुणांना अध्यात्मिक आवड निर्माण करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असतानाच तात्यांचे समाधी मंदिर बांधण्याचेही काम सुदाम महाराज पिसे व शिष्य परिवाराच्या वतीने सुरु आहे आणि तात्यांच्या आशिर्वादाने तेही काम लवकरच पूर्णत्वाला जाईल त्यांची पत्नी पारुबाई सुन लक्ष्मीबाई,नातसून काजल यांच्यावर व शिष्यपरिवारावर ह्या मंदिराची जबाबदारी पडली अ तसंसून त्यांनी लावलेल्या या महावटवृक्षाची जोपासना मनोभावे करतीलच असा आत्मविश्वास आहे,अशा या संतकुळीच्या राजाचा आज प्रथम पुण्यस्मरण समाधी सोहळा तात्यांच्या चरणी साष्टांग दंडवत,
सेवक .......


