पंढरपूर प्रतिनिधी
समाजालाही आपल्या कुटुंबाप्रमाणे जपणारी माणसं तशी विरळच! त्यातही परिस्थितीतं समयोचित भान ठेवून दीनदलितांच्या, गोरगरिबांच्या मदतीला धावणारी माणसंही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असतात. असेच आमच्या सर्वांचे म्हणजे वैद्यराज डॅा. कैलास उगले, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब डिंगरे, अभय वांकर पाटील, दिपक संतानी, पांडुरंगआबा बापट, संदिपदादा मांडवे यांचे स्नेही, भट्टड कलेक्शनचे मालक दिनेशजी भट्टड हे होत!
इ.स.२०२० च्या टाळेबंदीत ७६ दिवसांत ३९००० गरजूंना, तर इ.स. २०२१ च्या टाळेबंदीत ८४ दिवसात २६००० गरजूंना बसस्थानक, रेल्वेस्थानक, चंद्रभागा वाळवंट, निराश्रीत झोपडपट्टी आदि ठिकाणी उच्च प्रतीचे अन्नदान केले. यांना जीवनावश्यक वस्तू दान देण्याचे महत्कार्य दिनेश शेठजींनी केले. टाळेबंदीत दुकाने व्यवसाय बंद असतानाही कामगारांना पगार दिला. तसेच इ.स.२०२० व इ.स. २०२१ टाळेबंदीत “ना नफा, ना तोटा” या तत्वावर १२-१३ लाख मास्क उत्पादित करुन आपत्कालीन परिस्थितीत जोखीम पत्करुन वितरित केले, यात दिनेशभाईंनी प्रतिकूल परिस्थितीतही व्यवसाय-रोजगार-दातृत्व-कौशल्य यांचा अनोखा संगम घडवून आणला, हे विशेष!
व्यावसायीक परिसीमा ओलांडून दातृत्वाचे कसब अंगी बाणवणे सोपे नसते. पण इतरांच्याच सुखात आपले सुख आहे, हे आजमावणारी व्यापारी मंडळी क्वचितच आढळते. दिनेशभाईंचे अन्नदान, वस्त्रदान, सामाजिक कार्यातील गुप्त सहभाग हा नेहमीचाच असतो. त्यातही कुटुंब-व्यवसाय-मित्रमंडळ यांना सांभाळत सामाजिक कार्य करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. तरीसुद्धा भट्टड कुटुंबीय सर्वजण मिळून ३०-४० कामगारांनासह आषाढी वारी कालावधीत किमान १ लाख ते दिड लाख वारकरी, भाविकभक्तांना शुद्ध तुपातील सुग्रास भोजन २-३ दिवस देतात. पण कधी आपल्या या कार्याची वाच्यता करत नाहीत, हे विशेष!
दिनेशभाईंचं मित्रमंडळ हे मोजकं आहे, तरीही ते ५००० आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी सलोखा ठेवत असलेल्या दिनेशभाईंच्या तोंडात खडीसाखर व डोक्यावर बर्फाची लादी नेहमी असते. असे असुनही दिनेशभाईंचा शिस्तीचा शिरस्ता असतो, तो वेगळाच!!! मित्रमंडळीमुळे दिनेशभाई दरवर्षी तीर्थाटन, पर्यटन, देशाटन, परदेशवारी केल्याशिवाय राहत नाहीत. जीवनाचा खरा आनंद मित्रमंडळीसह द्विगुणित केल्याशिवाय राहत नाहीत. ते साथ-साथ (०७-०७) असतात, म्हणूनच दिनेशभाईंचा प्रगटदिनही ७-७ म्हणजे ०७ जुलै आहे, हे विशेष!
उद्योग व्यवसाय करत समाजाभिमुख कार्य करत असलेले दिनेश शेठजी हे राजकारण व राजकीय व्यक्तीपासून ४ हात लांबच असतात. पण मायपंढरीच्या विकासाची नेहमीच चिंता वाहतात. व्यापारीवर्गाला नेहमी सांगतात,” भाविकभक्तांशी सलोख्याने वागा, त्यांना मायमाऊली म्हणून पुकारा!” अशा शांतीप्रिय दिनेश शेठजींचा आज वाढदिवस.... ते आपला वाढदिवस आंबा, कडुलिंब,मोह या वृक्षांचे रोपण व रस्ता दुभाजकांमध्ये तुळशी बीज टाकून आपला वाढदिवस साजरा करतीलच.
दिनेश शेठजी, आपण शतायुषी व्हावे हिच विश्वमालक पांडुरंग जी व संत गाडगेबाबांच्या चरणी प्रार्थना केली.
साप्ताहिक राष्ट्रसंत च्यास वतीने दिनेश भाईंचा शाल-श्रीफळ-पुष्पाहार घालून पेढा भरवून वाढदिवसानिमित्त सत्कार करताना भावी नगराध्यक्ष धनंजयनाना कोताळकर, मसालेवाले सोमनाथ अष्टेकर, राधेश बादले पाटील, राष्ट्रवादीचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदिपदादा मांडवे, भावी नगरसेवक नानासाहेब शिंदे, सदगुरु स्वीटचे मालक पांडुरंग आबा बापट आदि मान्यवर उपस्थित होते.
व्यवसाय आणि दातृत्वाचा समन्यायी अविष्कार, परिसस्पर्शी मैत्रीचा साक्षात्कार, समयोचित मदतीचा अंगिकार केलेलं व्यक्तीमत्व म्हणजे दिनेशभाई (शेठजी) भट्टड
-✍🏼राधेश बादले पाटील, पंढरपूर

