भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये आषाढी वारी यात्रा कालावधीमध्ये उत्कृष्ट नियोजन करून यात्रा सुरळीत पार पाडल्या बद्दल संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील धोंडेवाडी तालुका पंढरपूर ग्रामपंचायतचे वतीने पंढरपूर तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सर्व पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख, व विश्वस्त फडकरी ,दिंडी मालक व हजारो वारकरी भाविक जि प सोलापूरचे सीईओ दिलीप स्वामी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आषाढी यात्रेचे उत्तम नियोजन झाल्याबद्दल प्रशांत काळे यांचे अभिनंदन केले.
व दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनपर गौरव पत्र देऊन सन्मान केल्याचे गटविकास अधिकारी काळे यांनी सांगितले. सत्कारा वेळी विस्तार अधिकारी अशोक नलावडे व धोंडेवाडी ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.

