मुंबई प्रतिनिधी - उदय वाघवणकर
जोगेश्वरी पूर्व स्थित शिवसैनिक व मौजे चरई बुद्रुक ता. तळा, जि. रायगड येथील सुपुत्र मनोहर काप यांची मुंबईत झालेल्या तळा तालुका मुंबई वासियांच्या निर्धार मेळाव्यात तळा तालुका विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोहर काप हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा आमदार रविंद्र वायकर यांच्या तालमीत वाढलेले निष्ठावंत शिवसैनिक असून सध्या जोगेश्वरी पूर्वे येथील शिवशक्ती क्रिडा मंडळाचे अध्यक्ष, चरई बुद्रुक मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा जोगेश्वरी रहिवासी सेवा संघाचे सरचिटणीस, शिवसेना शाखा क्र. ७७ मेघवाडीचे गटप्रमुख आदी पदांवर कार्यरत आहेत.याआधी मनोहर काप यांनी कुणबी समाजोन्नती संघ विभागीय शाखा जोगेश्वरीचे माजी सहचिटणीस तसेच शिवसेना तळा तालुका माजी उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली आहे.मनोहर काप यांचा तळा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क व याआधी भुषविलेल्या पदाचा अनुभव यामुळे शिवसेनेला तळा तालुक्यात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल असे बोलले जात आहे.
तळा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते अनंत गीते, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम व रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगनणे यांच्या उपस्थितीत मनोहर काप यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी मनोहर काप यांनी पक्षाने दिलेली तळा तालुक्याची जबाबदारी समर्थपणे पेलू असा व निर्धार बोलून दाखवला आहे.

