रेशन दुकानदार विषयी अनेक तक्रारी,अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
मायणी प्रतिनिधि
मायणी परिसरातील अनेक रेशन दुकानांमध्ये महिन्यातून एकदा रेशन येत असल्यामुळे रोजगार व हातावरचे काम सोडून एक दिवसाची हजरी बुडवून रेशन दुकानाच्या समोर रांगेत दुकान उघडायच्या आधीपासून रांगेत उभाराव लागते.
नंबर येण्यासाठी दोन अडीच तास किंवा अर्धा दिवस ही जातो व नंबर येताच मशीनच्या साह्याने अंगठा उठवण्यासाठी प्रयत्न केल्याने अंगठा उठत नसल्याचे कारण रेशन दुकानदार सांगून अनेक नागरिकांना माघारी घालवत आहेत .
असे अनेक महिने चालले आहे अनेक नागरिकांचे ऑनलाईन बारा अंकी नंबर असतानाही अंगठा उठत नसल्याच्या कारणाने अनेक महिन्याचे रेशनिंग नागरिकांना मिळाले नाही. यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत असून दुकानदारांची उलट उत्तरे ऐकावी लागत असल्याचे नागरिकांच्या मध्ये चर्चा होत आहे. याची तक्रार नागरिकांनी लेखी स्वरुपात मायणी शिवसेना कार्यकर्त्यांच्याकडे केली असून शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांसी संपर्क केला असता सर्व धान्याचा कोटा दुकानदाराला पोचला असून दुकानांमध्ये शिल्लक राहिलेले धान्य गोडवानामध्ये माघारी येत नाही ती सर्व नागरिकांना पुरविले जाते असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
अनेक महिने अनेक नागरिकांना धान्य मिळत नसून यांच्या नावाचे आलेले धान्य कुठे गायब होते. ज्या नागरिकांचे ऑनलाईन कार्ड असतानाही अंगठे उठत नसल्याच्या कारणावरून रेशन देत नाहीत तर हा राहिलेला साठा कुठे गायब होतो अनेक नागरिकांना छुप्या पद्धतीने हजारो रुपये प्रमाणे पोती विकली जातात तसेच शिल्लक धान्य माघारी गोडवानात न जाता धान्य दुकानदार व्यापाऱ्यांना विकला जातो या धान्याची दखल घेऊ नये म्हणून वरिष्ठ पुरवठा अधिकारी शेंडे व शिंदे यांना काही महिन्यातून एकदा गिफ्ट दिली जात असल्याची चर्चा नागरिकांच्या मधून होत आहे.
यांचा भ्रष्ट कारभार थांबवण्यासाठी दुकानदारांचे लायसन जप्त करून अधिकाऱ्यांना निलंबित करा असे मागणीसाठी शिवसैनिक पुरवठा जिल्हाधिकारी व महाराष्ट्र आयोग यांच्याकडे तक्रार करून अन्न नागरिक पुरवठा मंत्री यांना नागरिकांच्या लेखी तक्रारी घेऊन लवकरच भेटणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.