स्किलॅथॉन २०२३ मध्ये सोलापूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना १०००० रू . प्रथम पारितोषिक
सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनी जिल्हास्तरीय स्किलॅथॉन 2023 स्पर्धेत मेकॅनिकल विभागामधील "ऑइल लाईफ मॉनिटरिंग सिस्टीम फॉर इंजिन ऑइल ऑफ वेहिकल" या प्रोजेक्टच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविला.
उद्यम फाउंडेशन इन्कुबेशन सेंटर, कौशल्य विकास केंद्र, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि जिल्हा व्यवसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने सोलापूर येथील नॉर्थकोट प्रशालेच्या परिसरात स्किलॅथॉन २०२३ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील राहुल बागलकोटी आकाश कोरे दयानंद माने आणि शकीब शेख यांना प्रथम पारितोषिक सोबत रोख रक्कम दहा हजार रुपये मिळाले.या प्रोजेक्टला मार्गदर्शक म्हणून प्रा. अविनाश लावणीस, प्रा. श्रीकांत जगताप, प्रा. सुमेध पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच रवी धर्मशाळे, आशुतोष अवसेकर, प्रसन्न जाधव , प्रसाद कलदिप, जय हिबारे, आदर्श म्हणता यांच्या 'हायड्रोलिक क्रेन' या प्रोजेक्टला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा.कौस्तुभ मंगरूळकर आणि प्रा.शशिकांत लामकाने यांचे सहकार्य लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या प्रोजेक्ट गाईडचे डॉ.रवींद्र व्यवहारे, डॉ. शेखर जगदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले आणि सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सोलापूर सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.