पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार यांना विविध प्रकारचे बँक प्रकरण नोटरी करता अद्यापही शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले जाते.
याचाच गैरफायदा घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारातील स्टॅम्प विक्रेते शंभर रुपयाच्या स्टॅम्पची चढ्या दराने विक्री करताना आढळून येत आहेत. जर ग्राहकाने शंभर रुपयांच्या स्टॅम्प ला 110 रुपये अगर 125 रुपये न दिल्यास सरळ सरळ स्टॅम्प शिल्लक नाही. असे सांगून ग्राहकास टाळले जाते.
सध्या स्टॅम्प विक्रेते 100 रुपयाचा स्टॅम्प ज्यादा 10 ते 25 रुपये एकाच स्टॅम्प मागे घेऊन सर्रास विक्री करतात या विक्रीला व चड्या दराने स्टॅम्प देणाऱ्या येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा तर नाही ना अशी शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. या स्टॅम्प विक्रेत्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दुय्यम निबंधक वर्ग दोन यांची असताना सुद्धा हे अधिकारी अशा स्टॅम्प विक्रेत्यावर लक्ष ठेवण्याची सोडून त्यांना ज्यादा दराने विक्री करण्याची मूकसंमती तर देत नाहीत ना असे जाणवले जर शंभर रुपयाचा स्टॅम्प शंभर रुपये दिले तर हे स्टॅम्प विक्रेते तो देण्यास नकार देतात.
त्यामुळे नाईलाजाने ग्राहकाला एकाच स्टॅम्प मागे दहा ते पंचवीस रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकात नाराजी पसरली असून याबाबतची लेखी तक्रार जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे लवकरच करण्यात येणार आहे असे एका जबाबदार व्यक्तीने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले गेले अनेक दिवस अशा चढा दराने स्टॅम्प विक्री केली जात आहे शंभर रुपयाचा स्टॅम्प शंभर रुपये यास देण्यास खरेदी टाळाटाळ करतात त्यामुळे नाईलाजाने एका स्टॅम्प मागे दहा ते पंचवीस रुपये जादा देऊन तो घ्यावा लागतो. जर ज्यादा पैसे देण्यास नकार दिला तर स्टॅम्प चा तुटवडा आहे हे कारण सांगून एका विक्रेत्याने तर हे स्टॅम्प आणण्यासाठी आम्हालाही काही रक्कम मोजावे लागते म्हणून आम्ही एका स्टॅम्प मागे दहा ते पंचवीस रुपये घेतो अशी माहिती ग्राहकाला सांगितली. व त्याच्या गळ्यात जादा दराने हे विक्रेतें स्टॅम्प देतात येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्याने अशा विक्री करणाऱ्याची चौकशी करून ग्राहकांना आहे त्याच दरात विक्री करण्यास सांगून ग्राहकाची अडवणूक करण्यात येऊ नये अशी सूचना या विक्रेत्यांना देण्यात याव्यात. तसे न झाल्यास अधिकाऱ्याविरुद्ध व विक्रेत्याविरुद्ध लेखी तक्रार वरिष्ठ पातळीपर्यंत करण्यात येईल असेही एका ग्राहकाने सांगितले.