पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने कल्याणराव काळे यांचा सत्कार शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
त्यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.