भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे भावई चा सण मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
ज्येष्ठ वैद्य अमोशेच्या रात्री जोगण्या काढल्या जातात.दुसऱ्या दिवशी दुपारी गावातील प्रमुख मार्गावरून भावईची मोठी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी वाटी काढणे हा एक प्रकार असून वाटी काढणाऱ्या व्यक्तीस सुपली, परडी, काठीच्या सहाय्याने मारले जाते. त्याचबरोबर गावातील विविध मानकरी आहेत. यांच्या घरी आल्यावर भावईचे मनोभावे पूजन केले जाते.
त्यावेळी भावईच्या दिव्याची ही मिरवणूक काढली जाते. हा दिवा विजला जाऊ नये. यासाठी काळजी घेतली जाते. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. लहान मुलांना तर हा सण म्हणजे एक पर्वनीच असते.
यावेळी परिसरातील लहान मुले महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.