सोलापूर प्रतिनिधी
शिवसेना महिला जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या महिलांसाठी मोफत उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सर्व तळागाळातील गरजू व गृह उद्योगाची आवड असणारे महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे संयोजिका अस्मिता ताई गायकवाड यांनी आव्हान केले आहे.
महिलांना उद्योगासाठी करून देणार माफक दरात कर्ज उपलब्ध...
शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ,अस्मिता कृषि पर्यटन संचलित महिलागृह उद्योग व शिवसेना महिला आघाडी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभेत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना उपनेते आमदार डॉक्टर नीलम ताई गोरे, शिवसेना उपनेते व सोलापूर संपर्कप्रमुख संजनाताई घाडी यांच्या शुभहस्ते मनोरमा बँक चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, सोलापूर बार सोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट सुरेश गायकवाड व शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दिनांक 20 जून 2023 रोजी सायंकाळी साडेचार वाजता , अक्कलकोट रोड येथील अस्मिता विजन न्यूज चैनल च्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका तसेच अस्मिता कृषी पर्यटनच्या संस्थापिका अस्मिता ताई गायकवाड यांनी केले आहे