सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'अजाईल मेथोडोलॉजी' यावर आधारीत कॉम्प्युटर सायन्स विभागामार्फत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ.दत्तात्रय गंधमल यांनी केले. या कार्यशाळेस सुबोध कुलकर्णी टीसीएस, पुणे यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये सुबोध कुलकर्णी यांनी आय.टी . कंपनीमध्ये 'अजाईल मेथोडोलॉजीचा' वापर कशा प्रकारे केला जातो यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील एकूण ६२ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. अमृता रूईकर यांनी काम पाहिले.