महाराष्ट्र सरकार कडून होतोय जनतेच्या आयुष्याशी खेळ,पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील आज दि. २७ जून २०२३ रोजी सकाळी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र शिवसेना नगरसेवक अनंत (बाळा) नर यांना दारिद्रयरेषेखाली असणार्या शिधापत्रिका धारकांना शासनामार्फत मिळणार्या मोफत तांदूळ मध्ये भेसळ असल्याची तक्रार येताच त्वरित शिधावाटप अधिकाऱ्यांना बोलावून भेसळ तांदूळ मिळालेल्या प्रभाग क्र ७७ मधील मेघवाडी अधिकृत शिधावाटप दुकान २६ ड/ १४१ आणि दुकान २६ ड/७३ मध्ये प्रत्यक्षात जावुन शिधावाटप अधिकारी समोर भेसळ युक्त तांदळाच्या गोण्यांची तपासणी केली.
बर्याच गोण्या मध्ये प्लास्टिक युक्त तांदूळ मिळाले तेव्हा स्थानिक माजी नगरसेवक श्री. अनंत (बाळा) नर यांनी लगेचच भेसळ युक्त शिधा वितरण थांबवुन, शिधा वितरण ठेकेदारा वर कडक कारवाई करावी आणि जनतेची गैरसोय होवू नये म्हणुन तूर्तास सदर भेसळयुक्त तांदळाच्या गोण्या बदली करण्यात यावे, असे शिधावाटप सहाय्यक शिधावाटप अधिकारी सुनील काकडे, शिधावाटप निरीक्षक संतोष म्हात्रे, सुहास जगताप, स्वप्निल देसले, हेमंत परब यांना कठोर निर्देश देण्यात आले.
त्यावेळी शाखा प्रमुख श्री नंदकुमार ताम्हणकर, सुभाष मांजरेकर, शाखा समन्वयक उदय हेगिष्टे, राजापूर तालुका सह संपर्क प्रमुख जगन्नाथ कदम, व्यापार विभाग उपविभाग समन्वयक नामदेव बांदल, उपशाखाप्रमुख स्वप्निल सावंत गटप्रमुख रमा तावडे, अविनाश रासम, शैलेश बांदेलकर आणि आदित्य थेराडे उपस्थित होते.