मारापूर प्रतिनिधी
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांना मोफत अन्नदान करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे व इतर मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.
यावेळी महिला वारकऱ्यांनी फुगड्याचा खेळ खेळला.तर काही ठिकाणी भारुड ,अभंग, भजन कीर्तन प्रवचन याविषयीचे प्रबोधन करणारे कार्यक्रम पार पडले.यावेळी परिसरातील भाविक,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.