केसकरवाडी प्रतिनिधी बिरूदेव केंगार
पंढरपूर ता.केसकरवाडी सालाबादप्रमाणे याही वर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रथमेचे पूजन करून मान्यवरानी भाषण करून घोषणा दिल्या,यावेळी पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर डॉ. प्रसाद खांडिलकर व सर्व टीम पंढरपूर यांनी सर्व रक्त दाते यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी येथील महिला वैशाली धनाजी चव्हाण यांना प्रथमच रक्त दान केल्या बद्दल पंचशील दूध संस्थेचे चेअरमन संजय मासाळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित केसकरवाडी गावचे मा. तंटामुक्ती अध्यक्ष संजय मासाळ, नितीन केसकर, दत्तात्रय गोफने, गोपाळ यमगर, बालाजी चव्हाण, सौ.वैशाली धनाजी चव्हाण,यशवंत केसकर संतोष जावीर, राजू मासाळ, यावेळी सर्वांचे आभार संजय मासाळ यांनी मानले.