पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी येथील अवैद्य धंदे याबाबत वृत्तपत्रातून ओरड होतात व लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ने लक्ष्मी टाकळी परिसरातील अवैद्य धंदे बंद करण्याबाबत ठराव करून तो दारूबंदी अधीक्षक यांना पाठवल्यानंतर या अवैध धंद्याबाबत एक सविस्तर निवेदन दिल्यानंतर दारूबंदी अधीक्षक अर्थात एक्साईज इन्स्पेक्टर यांनी लक्ष्मी टाकळी येथे भेट देऊन ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करून लक्ष्मी टाकळी परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर लक्ष ठेवून कारवाईसाठी दारूबंदी अधीक्षकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने एक समिती स्थापन करण्याचे सुचविण्यात आले आहे.
ही समिती या परिसरात चालणाऱ्या वैद्य धंद्यावर देखरेखीचे काम करून त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे यात महत्त्वाची जबाबदारी ही दारूबंदी खात्याचीच आहे लक्ष्मी टाकळी येथे दारूबंदीचे अधिकारी सावंत. खेत्री व कदम यांनी एक सूची करून ती ग्रामपंचायतकडे केली आहे या माध्यमातून लक्ष्मी टाकळी परिसरात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे सूचित केले आहे आता जबाबदारी आहे ती लक्ष्मी टाकळी चे ग्रामपंचायत ग्रामसेवक हे समिती स्थापन करून सहकार्य करणार यावर सगळ्या पुढील गोष्टी अवलंबून आहे.