सोलापूर प्रतिनिधी
एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला तसेच यावेळी समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव व सिंहगड सोलापूर चे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. एस एम जगदे, डॉ. आर. टी. व्यवहारे उपस्थित होते.
या निरोप समारंभासाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, मधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांनी सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व अंतिम वर्षातील विद्यार्थी सिंहगड इन्स्टिट्यूट चे नाव उंचीवर नेतील असा विश्वास व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी मोनेश सुतार याने सिंहगड महाविद्यालयाने प्लेसमेंट च्या मुबलक संधी उपलब्ध करून दिल्यामुळे माझे व माझ्या वर्गमित्रांचे प्लेसमेंट द्वारे नोकरीची संधी मिळाल्याचे सांगितले.प्लेसमेंट साठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत फक्त कष्टाची तयारी आपण करावी असे आवाहन केले.विद्यार्थी मंडळाचा सचिव चिन्मय झोड याने देखील प्रथम वर्ष ते पदवी अंतिम वर्षात जो विकास झाला तो महाविद्यालयाच्या शिक्षकांमुळे व शिस्तप्रिय, शिक्षण पूरक वातावरण यामुळे झाला असे सांगितले.
यावेळी अंतिम वर्षातील बेस्ट आउटगोईंग स्टुडंट अवॉर्ड, नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी विक्रम अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड प्रयोग या स्पर्धेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जीवनात शिकलेल्या मूल्यांची जाणीव सतत ठेवावी असे आवाहन केले.
पुरस्काराचे वाचन प्रा. रवींद्र देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन धनश्री तळेकर या विद्यार्थिनीने केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुनीता सगट, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. रवींद्र देशमुख, प्रा. सुमेध पाठक यांनी परिश्रम घेतले.
बेस्ट आऊट गोइंग स्टुडंट साठी प्रचंड चुरस दिसून आली. यामध्ये सिव्हिल डिपार्टमेंट मधून निकिता कोळेकर, मेकॅनिकल मधून चिन्मय झोड, कॉम्प्युटर सायन्स चा कृष्णात कापसे व पूर्ण कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाचा अजय चौखंडे याला बेस्ट आऊट गोइंग चा पुरस्कार देण्यात आला. स्नेहल कोरटेकर हिला चार वर्षात सातत्याने अव्वल गुण मिळाल्याबद्दल व प्रतीक्षा गायकवाड हिला चार वर्षात सर्वात जास्त उपस्थिती बद्दल सन्मानित करण्यात आले.